महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचा दोन नोव्हेंबरला शाळा बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:47 PM2018-10-29T17:47:24+5:302018-10-29T17:49:52+5:30

शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणीविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला नाशिकसह राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी अव्हाड यांनी दिली

School admission of Marrakesh state education college on November 2 | महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचा दोन नोव्हेंबरला शाळा बंदचा इशारा

महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचा दोन नोव्हेंबरला शाळा बंदचा इशारा

Next
ठळक मुद्देशिक्षण संस्था चालकांचे 2 नोव्हेंबरला लाक्षणीक आंदोलन प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णयमागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत शाळा बंदचा इशारा

नाशिक : शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला मान्यता घेण्यासाठी दाखल करावे लागले खटले आणि अधिकारी पातळीवर येणाऱ्या अडचणीविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने २ नोव्हेंबरला नाशिकसह राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कर्मवीर व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी अव्हाड यांनी दिली सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेतून दिली. यासंदर्भात शिक्षण संचालकांना 22 ऑक्टोबरला निवेदन देण्यात आल्याचेही संस्थाचालकांनी सांगितले. 
महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांद्वारे गेली अनेक वर्ष  शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे . परंतु, गेल्या काही वर्षापासून संस्थाचालकांना अनेक आर्थिक, प्रशासकीय व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रभावित करणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने  मराराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने २ नोव्हेबरला राज्यातील शाळा बंद ठेवून लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील ७० ते ७५ शिक्षण संस्थांच्या शाळा यादिवशी बंद राहणार आहेत. परंतु, अनेक मोठ्या संघटना या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता आहे. मोठ्या शिक्षण संथांनी सरकारी हस्तक्षेपातून जवळपास ६३४ शिक्षकांची नियुक्ती करून घेतली आहे, त्यामुळे अशा संस्था सरकारच्या  दबावाला बळी पडत असून त्या या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे यावेळी  मराराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  यावेळी बाळासाहेब पाटील, रामराव मोरे, केशव पाटील, प्रभाकर धात्रक,  विजय काळे, सोमनाथ चौधरी, प्रवीणजोशी, गणपत मुठाळ, सुर्यकांत रहाळकर आदि उपस्थित होते. 

तर बेमुदत आंदोलनाचा
शिक्षण संस्था चालकांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांसदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने वारंवार पाठपुरावार करूनही सरकारक डून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संस्था चालकांनी लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही सराकारने संस्थाचालकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर दिवाळीनंतर बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही संस्थाचालकांनी यावेळी दिला.

Web Title: School admission of Marrakesh state education college on November 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.