पांढुर्लीत भरणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:27+5:302021-07-29T04:14:27+5:30

------------------- मामासाहेब दांडेकर यांना अभिवादन सिन्नर: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण कार्यक्रम सिन्नर महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी गुरुवर्य दांडेकर यांच्या ...

School to be filled in white | पांढुर्लीत भरणार शाळा

पांढुर्लीत भरणार शाळा

Next

-------------------

मामासाहेब दांडेकर यांना अभिवादन

सिन्नर: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण कार्यक्रम सिन्नर महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी गुरुवर्य दांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गुरुवर्य दांडेकर यांचे चरित्र दीपस्तंभासारखे आदर्श असून विद्यादान, ज्ञानप्रसार व समाजसेवा हेच ध्येय मानून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांचा आदर्श आजच्या पिढीच्या शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अतिथी हभप प्रा. अनिल दातार यांनी केले. यावेळी संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, प्राध्यापक डॉ. दत्तात्रेय फलके, सुनील कर्डक उपस्थित होते.

-----------------

बारागावपिंप्री-सुळेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

सिन्नर: तालुक्यातील बारागावपिंप्री-सुळेवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली असून, शेतकरी व शालेय विद्यार्थी यांची गैरसोय झाली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी बारागावपिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी केली आहे. आमदार निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन गोसावी यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना दिले आहे. विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी बारागावपिंप्री ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही केली आहे.

Web Title: School to be filled in white

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.