शाळेची घंटा वाजलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:19 PM2020-06-15T23:19:31+5:302020-06-16T00:18:40+5:30
नाशिक : शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात अथवा बंद ठेवण्यासंदर्भात रविवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत शिक्षकांनाही स्पष्ट सूचना मिळालेल्या नव्हत्या. अशा स्थितीत शहरातील महापालिके सह विविध खासगी शाळा सुरू होणार की नाही, याविषयी पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम असताना अखेर सोमवारी (दि.१५) शहरातील शाळा उघडल्या असल्या तरी कोणत्याही शाळेची घंटा, मात्र वाजली नाही.
नाशिक : शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात अथवा बंद ठेवण्यासंदर्भात रविवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत शिक्षकांनाही स्पष्ट सूचना मिळालेल्या नव्हत्या. अशा स्थितीत शहरातील महापालिके सह विविध खासगी शाळा सुरू होणार की नाही, याविषयी पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम असताना अखेर सोमवारी (दि.१५) शहरातील शाळा उघडल्या असल्या तरी कोणत्याही शाळेची घंटा, मात्र वाजली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याचा धोका पत्करला नाही, तर शाळांनीही दरवर्षाप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, विविध शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून, शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी वेगवगेळ्या शाळांकडून पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. परंतु. यंदा साफ सफाईने सुरुवात करावी लागली.
--------------------
शाळांची स्वच्छता
शाळेच्या आवारात येणाºया प्रत्येकासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, सर्वांसाठी मास्क व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शाळेत प्रवेशाच्या चौकशीसाठी येणाºया पालकांसाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच सूचना फलक लावण्यात आले असून, या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी माहिती देण्यात येत आहे.
]------------------------
शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचे आदेश प्राप्त झालेले नाही. आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गुणपत्रके तयार करण्याच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, यापुढे उद्यापासून शाळा नियमित सुरू होईपर्यंत शिक्षकांना दिवसाआड बोलाविण्याचे नियोजन आहे.
- राजेंद्र निकम, मुख्याध्यापक, सागरमल मोदी विद्यालय