स्कूल बसचालकांना १४ महिन्यांपासून काम नाही; काही चालवितात रिक्षा तर काही विकतात फळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:51+5:302021-05-20T04:15:51+5:30
मागील वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले, तशा शाळाही बंद झाल्याने आमचे काम थांबले. यामुळे वेगवेगळ्या ...
मागील वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले, तशा शाळाही बंद झाल्याने आमचे काम थांबले. यामुळे वेगवेगळ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खर्च भागविण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले; पण त्यातही पोलिसांचा त्रास सन करावा लागत आहे. - परमेश्वर मोरे
कोट -
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला संस्थेने पगार दिला; पण त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने त्यात कपात करण्यात आली. यामुळे घरखर्च भागविण्याबरोबरच इतर खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायी व्यवसाय म्हणून रिक्षा घेतली; पण सध्या रिक्षाचाही धंदा होत नाही. पर्यायाने बँकांचे हप्ते थकले आहेत. -श्रीराम पाटील
कोट-
काम बंद तर पगार बंद अशी स्थिती आहे. मालकासह कुणीही उचल देत नाहीत. आपल्याकडे काही शेती नाही. मुलगा थोडेफार पैसे पाठवतो सध्या त्याच्या आधारावरच सर्वकाही सुरू आहे. दुसरीकडे काम पाहण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही कुठे काही जमत नाही. -बबनराव मिसाळ
कोट-
मी राज्य परिवहन महामंडळात कामाला होतो. तेथील १८०० रुपये पेन्शन मिळते, सध्या त्याच्यावरच उदरनिर्वाह सुरू आहे. स्कूल बसचे काम बंद असल्याने सध्या घरीच बसून राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी कामाचा शोध घेतला; पण लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्याने कामही बंद मिळत नाही. - पाटील
नाशिक शहरात एकूण बसचालक २०००
स्कूल बसमधून जाणारे विद्यार्थी- १२५००