शालेय विद्यार्थ्यासाठी ‘चला विजयी होऊ या’ संस्कार पाठमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:13+5:302021-07-07T04:16:13+5:30
या पाठमालेत स्वतः व्यवहारे हे दररोज एक बोधकथा सांगणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत जुलै महिन्यात ...
या पाठमालेत स्वतः व्यवहारे हे दररोज एक बोधकथा सांगणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत जुलै महिन्यात संस्कारक्षम पाठमाला घेण्यात येणार आहे. यामध्ये दररोज एक बोध कथा सांगण्यात येईल.
हा उपक्रम राबवण्यासाठी या संस्कार पाठमालेचे समन्वयक जगदीश बागडे, प्रा. एम. एस. माळी, सुभाष खाटेकर आदी परिश्रम घेत आहे.
उदघाटन विश्वस्त आप्पासाहेब उगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी दिलीप वाघवकर, मधुकर राऊत विश्वास कराड, नरेंद्र नांदे, प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी.आर. सोनवणे पर्यवेक्षक एम.एस. माळी पर्यवेक्षक एन. डी. सिरसाट, प्राचार्य देवेंद्र सांबरे पर्यवेक्षक पल्लवी सानप, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, मुख्याध्यापिका प्रसन्ना कुलकर्णी, पर्यवेक्षक पल्लवी सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------------
‘चला विजयी होऊ या’ पुस्तकाचे प्रकाशन करताना आप्पासाहेब उगावकर. सोबत वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी दिलीप वाघवकर, मधुकर राऊत विश्वास कराड, नरेंद्र नांदे आदी. (०५ निफाड)
050721\05nsk_15_05072021_13.jpg
०५ निफाड