इगतपुरी, सुरगाण्यात शाळा आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 10:58 PM2022-07-11T22:58:57+5:302022-07-11T22:58:57+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यात एकूण ३८५ शाळा असून जिल्हा परिषदेच्या २२२ शाळा आहेत. ५० हजारांच्या जवळपास विद्यार्थी असून तालुक्यातील अतिदुर्गम भाग जास्त असल्याने वाढता संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाच्या सोमवारी (दि.११) झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम व इगतपुरी तालुका गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी मंगळवारी एकदिवसासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शाळा बंद ठेवण्यासंदर्भात केंद्र प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांना व्हॉटसॲपवर मेसेज पाठविले असल्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले.
सुरगाण्यात दोन दिवस सर्व शाळा बंद
सुरगाणा : संपूर्ण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व १२ ते १३ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश तहसिलदार सचिन मुळीक यांनी शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत.
गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून नदी - नाल्यांना पूूर आला आहे. जिल्ह्यात सुुुुणा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरूच असून अनेक विद्यार्थी जाऊन येऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सूरगाणा गटातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा दिनांक १२/७/२२ ते १३/७/२२ रोजी बंद ठेवण्यात याव्यात असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी संबंधितांना कळविले असून याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कोळी यांनी केले आहे.