खेडलेझुंगेत आठवडेबाजारासह शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 07:04 PM2021-02-17T19:04:07+5:302021-02-17T19:04:41+5:30
खेडलेझुंगे : मागील हप्त्यामध्ये गावात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिसरामध्ये भयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने सोमवार ते बुधवार बंद ठेवण्याचा सर्वामुनते निर्णय घेतला होता. तीन दिवस बंद ठेवुन येथे बुधवारी भरणारा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आलेला आहे. तसेच शाळा, महाविद्यालय ४/५ दिवस बंद ठेवण्यात आलेले आहेत.

बंद कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले होते. यावेळी मेडीकल वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवुन प्रशासनास मदत केली. आरोग्य विभागाने तत्परता दाखवुन आशासेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गावामध्ये तातडीने सर्वे सुरु केला आहे. दरम्यान रुग्ण असलेल्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीने अत्यावश्यक त्या सेवा पुरविल्या आहेत.
गावामध्ये ४ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहीती आरोग्य प्रशासनाकडुन देण्यात आली. नागरीकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करणेबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
प्रशासनाकडून आवाहन
मागील आठवड्यात वृध्दाचा मृत्यु झाल्यानंतर ते पॉझिटीव्ह असल्याची अफवा पसरली. संबंधीत वृध्दाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने परिसरामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. परंतु गावात अजुनही ४ रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडुन करण्यात आले. नागरीकांनी यापुढे मास्क नियमित वापरावे. अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. असेही आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांना मिळालेली मोकळीक यामुळे खेडलेझुंगे सह परिसरामध्ये रुग्णांची संख्या अजुन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असल्याने रुग्णांचा खरा आकडा मिळणे अत्यंत बिकट झालेले आहे. (१७ खेडलेझुंगे, १)