डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण उपक्र म चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 02:30 PM2020-07-27T14:30:28+5:302020-07-27T14:31:27+5:30

जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

School closure activities continue at Dangsaundane Center | डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण उपक्र म चालू

डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण उपक्र म चालू

googlenewsNext
ठळक मुद्देया उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे.

जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या केंद्रामध्ये अँड्रॉइड मोबाईलधारक पालकांची संख्या नगण्य असून सुद्धा व्हॉटसअप, दिक्षा अ‍ॅप, टेलीग्राम, झूम मिटिंग, गुगल मीट, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण चालू आहे. ज्या पालकांकडे साधे फोन आहेत अश्यांच्या विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे किंवा फोन कॉल करून अभ्यास देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक शाळेतील सर्वच शिक्षक आठवड्यातून किमान दोन दिवस विद्यार्थ्यांच्या घरी जावून अभ्यास देणे हे कार्य करीत आहे.
या केंद्रातील बरेच शिक्षक ई-साहित्य निर्मिती करत असून काहीजण यूट्यूबवर आपले व्हिडिओ बनवत आहेत. तर काहीजण पीडीएफ स्वरूपात अभ्यास निर्मिती करत आहेत. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी या संदर्भात नियोजन केले असून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहेत.
आॅनलाईन असो किंवा आॅफलाईन असो शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे हाच या उपक्र माचा उद्देश आहे. बागलाण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे हे यासंदर्भात शिक्षकांना वारंवार मार्गदर्शन करीत असून नुकतेच त्यांनी तालुक्यातील जवळपास एक हजार शिक्षकांसाठी आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
यासंदर्भात डांगसौंदाणे बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार व केंद्रप्रमुख हिरालाल बधान हे शिक्षकांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचा आढावा घेत आहेत. एकंदरीत डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे.
 

Web Title: School closure activities continue at Dangsaundane Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.