शाळेचे ग्रहण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:36 PM2020-06-01T21:36:47+5:302020-06-02T00:44:24+5:30
चांदोरी : येथील गडाख वस्ती शाळेच्या विविध समस्यांबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ग्रामपालिकेच्या वतीने शाळेच्या परिसराची स्वच्छता करून शाळेभोवती लोखंडी जाळ्यांचे कुंपण केले आहे.
चांदोरी : येथील गडाख वस्ती शाळेच्या विविध समस्यांबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ग्रामपालिकेच्या वतीने शाळेच्या परिसराची स्वच्छता करून शाळेभोवती लोखंडी जाळ्यांचे कुंपण केले आहे.
काही दिवसांपासून शाळेचा परिसर मद्यपींचा ओपन बार, प्रेमीयुगुलांचे भेटण्याचे ठिकाण बनला होता. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेभोवती लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध
झालेल्या बातमीची दखल घेत स्थानिक प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला लोखंडी जाळीचे कुंपण केले.
ही शाळा गावापासून दोन किलोमीटर दूर मळ्यात आहे. रहदारी कमी व आजूबाजूला शेत आहे. शाळा परिसर खुला
असल्याने कोणीही शाळेच्या प्रांगणात येऊ शकतो. याचा गैरफायदा घेत मद्यपी व जुगारी यांच्यासाठी हे हक्काचे ठिकाण झाले होते. शाळेच्या प्रांगणात बाटल्यांचा खच पडून असायचा.
ज्ञानदान देणाऱ्या वास्तूची होत असलेल्या विटंबनेविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत ग्रामपालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शाळा परिसर स्वच्छ केला. अंगणवाडी व प्राथमिक शाळेभोवती लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे.
----------------------------
शिक्षण देणाºया ठिकाणी गैरकृत्य करणे निंदनीय आहे. या अवैध गोष्टीला आळा घालण्यासाठी शाळेला लोखंडी जाळीचे संरक्षक कुंपण करण्यात आले. शाळेची प्रवेशप्रक्रि या सुरू होत असल्याने शाळा परिसरची स्वच्छता करण्यात आली आहे.
- वैशाली चारोस्कर, सरपंच ग्रामपालिका, चांदोरी