मंदिराच्या ओट्यावर भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:44+5:302021-06-16T04:18:44+5:30

नांदगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी तळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. शाळा ...

The school is full of temples | मंदिराच्या ओट्यावर भरली शाळा

मंदिराच्या ओट्यावर भरली शाळा

Next

नांदगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी तळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. शाळा हनुमान मंदिराच्या ओट्यावर भरविण्यात आली. आई-वडील मजुरी करतात. त्यांच्याकडे मोबाईल नाहीत. म्हणून शिक्षक राजेंद्र कदम यांनी यावेळी घरी व वस्त्यांवर जाऊन शिकविण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या दिवशी अनेक पालक स्वत: पाल्यांना घेऊन शाळेत आले. वर्षभर घरी राहून मुले व आम्ही कंटाळलो आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कदम यांनी मुलांना चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. सर्व मुले शाळेत येण्यासाठी उत्सुक आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाकडून पुस्तके देण्याचा प्रघात दोन वर्षांपासून बंद आहे. गेल्या वर्षी आधीच्या वर्षाची पुस्तके अदलाबदली केली. यंदा तीच पुस्तके पुन्हा उपयोगात आणावी लागणार आहेत. दोन वर्षे झाल्याने पुस्तके खराब झाली आहेत. कोरोनाचे नियम पाळून शाळा भरविण्यात आली.

------------------------------

पहिल्या दिवशी तळेवस्तीच्या शाळेत विद्यार्थ्यांना राजेंद्र कदम यांनी शिकविले. (१५ नांदगाव १)

===Photopath===

150621\15nsk_4_15062021_13.jpg

===Caption===

१५ नांदगाव १

Web Title: The school is full of temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.