नाशकात सुरु झाली ‘जिजाऊ सावित्री’ची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:29 PM2018-04-12T13:29:19+5:302018-04-12T14:04:43+5:30
या उपक्रमाद्वारे मुले चांगल्या प्रकारे अक्षरे गिरवू लागली आहेत
नाशिक- पंचवटीच्या फुलेनगर येथील गजानन चौकात लोकमुद्रा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कष्टकरी वर्गातील मुलांसाठी ‘जिजाऊ-सावित्री’ शाळा सुरु करण्यात आली असून या उपक्रमाद्वारे मुले चांगल्या प्रकारे अक्षरे गिरवू लागली आहेत. गरजू कुटुंबातील व आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा उपक्र म उपयूक्त ठरत आहे. विशेष म्हणजे वस्तीतील कॉलेजमध्ये शिकणारेच मुले-मुली या लहान मुलांना शिकवण्याचे काम करत आहे.
वस्तीत रहाणाऱ्या कष्टकरी वर्गाकडे त्यांच्या मुलांवर लक्ष देण्यासाठी वेळ नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वस्तीतील लहान मुले चुकीच्या वळणाला जाऊ नये, त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळावेत यासाठी लोकमुद्राच्या सदस्यांनी पुढाकार घेत महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत सावित्रीची शाळा सुरु केली. या शाळेद्वारे मुलांना मुलभूत शिक्षण दिले जात आहे. त्यांचा पाया पक्का करुन घेतला जात आहे.
यावेळी लोकमुद्राचे संस्थापक सचिव सागर निकम, विशाल रणमाळे, कोमल गांगुर्डे,सामाजिक कार्यकर्ता योगेश कापसे, समाधान बागुल, कल्याणी अ. म.,गणेश चौधरी उपस्थित होते.