शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:41 AM2019-12-03T01:41:27+5:302019-12-03T01:41:55+5:30
येथील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालय विल्होळी विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती व रांगोळीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जेची निर्मिती व त्याचे फायदे याविषयी संदेश देण्यात आला.
विल्होळी : येथील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालय विल्होळी विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती व रांगोळीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जेची निर्मिती व त्याचे फायदे याविषयी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के. अहिरे उपस्थित होते. या कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे राज्य प्रयोगशाळा परिसर संघाचे विभागीय अध्यक्ष संग्राम करंजकर, पीडीएफ संघाचे नीलेश ठाकूर यांनी महात्मा फुले व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. अध्यक्ष के. के. अहिरे यांनी विज्ञानाचा दृष्टिकोन कविता रूपाने विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद माजी सदस्य बाबुराव रूपवते यांनी आपल्या बालपणीच्या उदाहरणातून वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात नावीन्यपूर्ण साहित्य केले. त्यांचा दैनंदिन जीवनात वापर झाला पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर करू नये, टिकाऊ व विना खर्चिक वस्तूंची निर्मिती करून इतरांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक रांगोळी काढून त्याच्यातून विज्ञान संदेश देण्यात आले. कार्यक्र मासाठी शाळेचे पालक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ भावनाथ, सामाजिक कार्यकर्ते बबन गायकवाड, नाना निंबेकर, उत्तमराव थोरात, भिवाजी चव्हाण, कुस्ती संघाचे वाळू नवले उपस्थित होते. मुख्याध्यापक एन. डी. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डी. एस. अहिरे यांनी केले. ए. एम. बच्छाव आभार यांनी मानले.