शालेय ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीचा तिढा सुटणार
By admin | Published: December 25, 2014 01:14 AM2014-12-25T01:14:09+5:302014-12-25T01:14:10+5:30
राज्य शासनाचे आश्वासन : ७० अवमान याचिका दाखल
नाशिक : राज्यातील माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना बीएड स्केल म्हणजेच शिक्षकांप्रमाणेच पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात राज्य सरकाराने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तब्बल उच्च न्यायालयात तब्बल ७० अवमान याचिका दाखल झाल्यानंतर आता त्याबाबत विधिमंडळाचे अधिवेशन संपताच तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच दिले आहे.
राज्यातील माध्यमिक शाळांमधील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी यासाठी ग्रंथपालांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आजवर अडीचशे निकाल निकाल ग्रंथपालांच्या बाजूने लागल. आहेत. पहिल्या याचिकेचा निकाल विरोध गेल्यानंतर राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु तीही सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर आजवर उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात तब्बल ७० अवमान याचिका दाखल झाल्या असून राज्य सरकार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही अशी ग्रंथपालांनी तक्रार केली आहेत. यासंदर्भात शिक्षक आमदार रामनाथ मौते आणि ग्रंथपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)