अलई विद्यालयात शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 05:22 PM2019-07-14T17:22:36+5:302019-07-14T17:22:49+5:30
नामपूर : येथील उन्नती संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयात लोकसहभागातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात गणवेश, वह्या, पुस्तके, पेन्सिल , पेन , कंपासपेटी आदि साहित्याचा समाावेश होता.
या शालेय साहित्याच्या वाटपासाठी स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण सावंत, डॉ. निनाद जोशी, खंडू भामरे, नितीन नेर, संदिप खानकरी, जयेश खुटाडे, पप्पू मैंद, कविता सावंत, कुतूब बोहरी, सई महेश सावंत, सुरेंद्र वाघ, वासुदेव नागमोती, राहूल सावंत, युसुब बोहरी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आर्थिक मदत केली. मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांनी देणगीदारांचे आभार मानले. विद्यालयात आयोजित कार्यक्रमात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी किरण सावंत, नितीन नेर, महेश सावंत, युसूफ बोहरी, राहूल सावंत, संदिप खानकरी, कविता सावंत ,कुतूब बोहरी आदिंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्र मात शालेय साहित्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांस एक वृक्षांचे रोप देण्यात आले. वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. स्वत:च्या शेतात अथवा घरापुढे किंवा चौकात सदर रोप लावण्याचे आवाहन मुख्याध्यापक नेरकर यांनी केले.