दोडीत २४ वर्षांनंतर भरली आठवणींची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:24 AM2021-03-13T04:24:55+5:302021-03-13T04:24:55+5:30
आपल्याला ज्या शाळेने मोठे केले, त्या शाळेचे आपण देणे लागतो या उद्देशाने विष्णू वाघ, नामदेव आव्हाड यांच्या संकल्पनेतून बाळू ...
आपल्याला ज्या शाळेने मोठे केले, त्या शाळेचे आपण देणे लागतो या उद्देशाने विष्णू वाघ, नामदेव आव्हाड यांच्या संकल्पनेतून बाळू रहाटळ, मंगल शेळके, शारदा दिघोळे, शोभा आव्हाड यांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधत यशस्वी नियोजन केले. माजी शिक्षक एम. बी. कोराळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास संदीप देसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक टी. पी. सहाणे, टी.एस. दिघोळे पतसंस्थेचे अध्यक्ष पी. डी. विंचू, पोपट कुटे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य माधव गिते, माजी मुख्याध्यापक पी. इ. पाटेकर, अर्जुन सानप, बी. के. सांगळे, बी. बी. सांगळे, प्रा. घुले, प्रा. काकड, प्रा. घुगे आदी उपस्थित होते. कोरोनोचे संकट असतानासुद्धा शाळेसाठी काही करण्याची जिद्द मनाशी बाळगून सर्व एकत्र आल्याचे कौतुक पी. डी. विंचू यांनी केले. विद्यालयात संगणकीय प्रशिक्षणासाठी संगणकाची कमतरता असून विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणकाअभावी प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी येथे उत्कृष्ट प्रकारची संगणकीय शाळा उभारण्याची कल्पना माजी विद्यार्थी लहान शेळके यांनी मांडली. शिक्षक व विद्यार्थी यांनी आठवणींना उजाळा दिला. डॉ. रामहरी वाघ, चंद्रभान जाधव, ज्ञानेश्वर आव्हाड, विजय कांगणे, कैलास जाधव. भिकाजी उगले, सखाराम दराडे, अशोक शेळके, राजेंद्र घोलप, योगेश साबळे, चंद्रभान शेळके, रंजना सांगळे, तारा बर्के, भारती आव्हाड, चंद्रकला सानप, सुवर्णा सानप, मीरा आव्हाड, वंदना सांगळे, अलका खाडे, मोहन आंधळे, अण्णा साबळे, प्रवीण लांडगे, अरुण पवार, पंढरी शेळके, हेमंत आव्हाड, बाळू आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड आदींसह माजी विद्यार्थी उपस्थित होते. रावसाहेब म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. उमेश बैरागी यांनी आभार मानले.
===Photopath===
110321\11nsk_2_11032021_13.jpg
===Caption===
दोडी येथील श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी व शिक्षक.