शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:20+5:302021-08-23T04:17:20+5:30

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य ...

As the school was closed, the mental health of the children as well as the parents deteriorated! | शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले !

Next

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य इतरांपासून मागे तर पडणार नाही ना? या भीतीपोटी पालक मुलांवर पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने लक्ष ठेवत असून, प्रत्यक्ष शालेय शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना सातत्याने सतावत आहे. याच तणावातून पालकांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडत असल्याचे समोर आहे, तर पालकांकडून मुलांवर पूर्वीपेक्षा अधिक लक्ष केंद्रित केल्याने मुलांना त्यांच्यावरील बंधनांमध्ये अनावश्यक वाढ झाल्याची भावना निर्माण होऊन मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांसोबतचा संवाद वाढवून त्यांना सुरक्षित वातावरणात खेळण्यासाठी तसेच घरातील छोटया मोठ्या गोष्टींमध्ये सक्रीय सहभाही होण्याची संधी देण्याची गरज असल्याचा सल्ला मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - ११७०४५

दुसरी -१२१३४२

तिसरी -१२०६१८

चौथी- १२३९३९

पाचवी- १२२७४३

सहावी - १२०६४५

सातवी- ११८३३२

आठवी- ११५९१०

नववी- १११४२१

दहावी- ९८९४९

मुलांच्या समस्या...

- ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये स्क्रीन एक्स्पोजर वाढले आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टी मुलांसमोर येऊ लागल्याने त्यांचे लक्ष विचलित होत आहे.

- पालकांकडून अभ्यासासाठी सातत्याने पाठपुरावा होत असल्याने मुलांवर केवळ अभ्यासाचा ताण निर्माण होऊन त्यांच्यात चिडचिड वाढत आहे

- शाळा बंद असल्याने मुलं घरामध्ये कोंडली गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढीला लागला असून, ती नैराश्याकडे जाण्याची भीती निर्माण होत आहे.

---

पालकांच्या समस्या...

- ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे आपला पाल्य दुर्लक्षित होऊन तो इतरांच्या तुलनेत मागे तर पडणार नाही ना? अशी भीती पालकांमध्ये वाढीस लागली आहे.

- गेल्या दीड वर्षात घरातच अडकून पडलेल्या मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढीस लागल्याने त्यांच्या आरोग्याची चिंताही पालकांना सतावत आहे.

- शासनाने ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशी मोहीम राबवली असली तरी आता प्रत्यक्षात घरोघरी ‘शाळा बंद, समस्या सुरू’ अशी परिस्थिती असून, मुलांना मिळणारे उपक्रम, शिक्षण, शिबिरे यांचे ऑनलाइन पर्याय अपुरे तर ठरत नाही ना, याची चिंता पालकांमध्ये वाढीस लागली आहे. ---

मुलाकडून ऑनलाईन पर्यायाचा शिक्षणासाठी वापर वाढला असून, गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने त्यांचा शिक्षक, शालेय मित्र व सभोवतालच्या वातावरणाशी संपर्क तुटला आहे. त्याचा परिमाण त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊन त्यांच्यात चिडचिड, एकलकोंडेपणा, लठ्ठपणा व नैराश्य वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्यांची मानसिक, भावनिक व सामाजिक विचारांची क्षमताही आवश्यकतेनुसार विकसित होत नाही. तुलनेत पालकांवर एवढा परिमाण होत नसला तरी मुलांचे बदलणारे वर्तन पालकांवर मानसिकदृष्ट्या परिणाम करणारे ठरते. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत संवाद वाढविणे आवश्यक आहे. तसेच घरातील छोट्या मोठ्या कामात मुलांना सहभागी करून घेणे, सुरक्षित वातावरणात खेळण्याची परवानगी देण्याची गरज आहे.

डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक.

Web Title: As the school was closed, the mental health of the children as well as the parents deteriorated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.