आता दोन सत्रात शाळा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:53 PM2020-05-20T22:53:24+5:302020-05-21T00:02:59+5:30
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुरू करण्याची शक्यता आहे. शिक्षक संघ आणि संस्थाचालकांनी याबाबतची अनुकूलताही दर्शविली आहे.
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुरू करण्याची शक्यता आहे. शिक्षक संघ आणि संस्थाचालकांनी याबाबतची अनुकूलताही दर्शविली आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सध्या अशा क्षेत्रामधील शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हा राहणारच असल्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळा या दोन सत्रात सुरू करण्याबाबतची अनुकूलता दर्शविण्यात आली आहे. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालकांनी शाळांमध्ये सामासिक अंतर राखण्यासंबंधी मार्गसूची जारी केली असून तशाच प्रकारे सूचना अमलात आणून महाराष्टÑातही शाळा सुरू करण्याबाबतचे विचारमंथन सुरू झाले आहे. कर्नाटक शिक्षण बोर्डाने शाळा दोन सत्रात सुरू करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच फिजिकल डिस्टन्ससाठी घेतलेले निर्णय महाराष्टÑातही राबविले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर दोन सत्रात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण संस्थांना मोठी तयारी करावी लागणार असून, वर्ग खोल्या आणि शिक्षकांची तरतूद अगोदरच करावी लागणार आहे. सकाळचे सत्र ७.५० तर दुपार सत्राची शाळा १२.१० ला सुरू होणार आहे.
कर्नाटक सरकारच्या निर्णयानुसार दोन सत्रांमध्ये शाळा भरविण्यात येणार असली तरी शिक्षकांनादेखील एका सत्रात काम करावे लागणार आहे. मात्र पहिली ते सातवी, आठवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरवावी लागणार आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमतरता असल्यास तेथेदेखील दोन सत्रात शाळा भरवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शिक्षकांची कमतरता भासत असेल तर स्थानिक परिसरातील अतिथी शिक्षकांची नेमणूक करता येणार आहे.
------------
कर्नाटक सरकारने दोन सत्रात शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे . महाराष्ट्रातही सामासिक अंतर राखून, मुलांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता बघून शाळा दोन सत्रात सुरू करण्यास हरकत नाही. शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, पालक, शिक्षक यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- एस. बी. देशमुख, सचिव,
पश्चिम महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे