शालेय विद्यार्थीनीचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 03:58 PM2020-06-16T15:58:11+5:302020-06-16T15:58:19+5:30
पेठ -शैक्षणिक वर्षाच्या पिहल्या दिवसाची घंटा कोरोना मुळे वाजली नसली तरी तालुक्यातील पातळी येथील एका चिमूकलीसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाची पहाट मात्र काळरात्रच ठरली.
पेठ -शैक्षणिक वर्षाच्या पिहल्या दिवसाची घंटा कोरोना मुळे वाजली नसली तरी तालुक्यातील पातळी येथील एका चिमूकलीसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाची पहाट मात्र काळरात्रच ठरली.
पातळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेली चंदना परशराम पाडवी हीस रविवारी ( दि.१४) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास झोपेतच विषारी सापाने चावा घेतला. पालकांच्या ही बाब लक्षात आल्यावर तिला तात्काळ प्रारंभी करंजाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शरिरात विष संचारल्याने पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालवली वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषीत केले. चंदना ही आई विडलांची एकूलती एक मुलगी होती. या घटनेने शाळेच्या पिहल्या च दिवशी संपूर्ण गावावर शोककळा पसरली विद्यार्थी व शिक्षकही या अकस्मात घटनेने सुन्न झाले. चंदनासाठी शाळेचा पहिला दिवस मात्र अखेरचा दिवस ठरला. या बाबत पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------------
पालकांनी मुलांची काळजी घ्यावी
सद्या लॉक डाऊन व कोरोना संसर्ग असल्याने तुर्त शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. पावसाचे दिवस असल्याने पालकांनी मुलांना नदी, नाले, तलाव किंवा अडचणीच्या जागी खेळायला पाठवू नये. तसेच रात्री अपरात्री काळजी घ्यावी असे आवाहन गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी केले.