शाळांमध्ये बालगोपाळांची निघाली दिंंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:10 AM2018-06-18T00:10:18+5:302018-06-18T00:10:18+5:30
विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.
नाशिक : विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.
विवेकानंद विद्यालय
येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रभागातील नगरसेवक श्याम बडोदे यांच्या हस्ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक कल्पना बोरसे, अरुण जाधव, यशश्री गायधनी, धनश्री गर्गे, प्रिया शेवाळे, चित्रा बोंडे, छाया पवार, रश्मी ढोबळे, संदीप जोपळे, विजया ठाकरे व शिरीष विभांडिक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विनायक नवसुपे यांनी केले.
डे केअर शाळा
येथील डे केअर सेंटर शाळेत शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गायिका संपदा हिरे व माजी विद्यार्थी राहुल उगावकर, रोटरीचे क्लब पश्चिमचे अध्यक्ष कौसर आझाद उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. यावेळी पर्यावरणदूत म्हणून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब उगावकर, सचिव गोपाळ पाटील, अॅड. अंजली पाटील, वसंत कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, अनिल भंडारी, छाया निखाडे, डॉ. मुग्धा सापटनेकर आदी उपस्थित होते.
कर्मवीर हिरे विद्यालय
कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड या शाळेत पहिल्या दिवशी प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक देवराम डामरे, नितीन देवरे, सुजाता पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते.
महादेववाडी मनपा शाळेत नवागतांचे स्वागत
सातपूर येथील महादेववाडी येथील मनपा शाळेत नव्याने दाखल झालेल्या नवागतांचे स्वागत आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या उपस्थितीत प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, गोकुळ निगळ, योगेश गांगुर्डे, किरण बद्दर आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे रवींद्र केडिया होते. यावेळी नवागतांचे पूजन करून स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते मुलांना पुस्तके वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक छाया तिवडे यांनी स्वागत केले. कांचन बडगुजर यांनी आभार मानले. यावेळी पालक, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.