शाळेचा मनमानी कारभार
By admin | Published: January 25, 2017 11:52 PM2017-01-25T23:52:36+5:302017-01-25T23:52:53+5:30
निवेदन : विद्यार्थी पालक समितीची स्थापना
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूलच्या मनमानी कारभाराबद्दल त्रस्त पालकवर्गानी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. तसेच शाळेच्या विद्यार्थी व शिक्षणाविरोधी धोरणाविरुद्ध पालक समिती स्थापन केली आहे. गुरू गोविदसिंग पब्लिक स्कूलमध्ये, मध्यमवर्गीय आणि नोकरदारांचे पाल्य आहेत. शाळेच्या दिवसागणिक वाढणाऱ्या मनमानी कारभाराबद्दल त्रस्त पालक वर्ग एकवटले आहेत. शाळांनी भरमसाठ वाढलेले शुल्क आणि ती एकरक्कम व रोख स्वरूपात भरण्यास सांगण्यात येत आहे. धनादेश घेणे नाकारतात. तसेच फीचे दोन ते तीन टप्पे करण्याची मागणी करूनही दखल घेत नाही. तसेच परीक्षा शुल्क व इतर शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसविले जात नाही. ेशाळेतून मिळणाऱ्या पुस्तकांच्या किंमती कमी कराव्यात, आरटीईच्या नियमानुसार शुल्क वाढीची माहिती द्यावी, त्यामुळे संतप्त पालकवर्गानी शाळेसमोर निदर्शनेही केली. शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात इतर भूलथापांच्या नावाखाली आकारलेली भरमसाठ फी कमी करणे, विलंब शुल्क बंद करणे, आणि जर विविध मागण्या असलेले निवेदन देण्यात आले. निवेदनावर नरेंद्र चरणे, सोनाली पळसकर, युवराज पवार, निशांत जाधव, असज दहिया, अनिल गायकवाड, दीप्ती पवार, लक्ष्मी बडई, सीमा पवार, यशदास पाटीलसह पालकवर्गाच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)