शाळांना पुस्तकांची प्रतीक्षा क ायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 10:12 PM2020-06-15T22:12:20+5:302020-06-16T00:17:05+5:30
नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. कोरोनाच्या संकटात यावर्षी सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले नाही, असे असले तरी पहिल्याच दिवशी पुस्तक वितरणाची परंपरा कायम राखण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्याचे नियोजन केले होते.
नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. कोरोनाच्या संकटात यावर्षी सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले नाही, असे असले तरी पहिल्याच दिवशी पुस्तक वितरणाची परंपरा कायम राखण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्याचे नियोजन केले होते. मात्र अद्याप शहरातील केंद्र शाळांनाच पुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याने शाळास्तरावरही पुस्तकांची प्रतीक्षा कायम आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात शिक्षण विभागाचे दोन भाग असून, यातील नाशिक शहर भाग एकमध्ये तर नाशिकरोड व सिडको भाग दोनमध्ये आहे. या दोन्ही भागांमध्ये पुस्तकांसाठी दोन स्वतंत्र गुदामे आहेत. शहर परिसरात गायकवाडनगर येथील शाळा क्रमांक ३४ येथील गुदामातून पुस्तकांचा पुरवठा होतो, तर नाशिकरोड व सिडको भागासाठी जेतवननगर येथील शाळा क्रमांक ५५ येथून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही गुदामांमधून महापालिकेच्या व खासगी अनुदानित अशा मिळून सुमारे १७२ शाळांना २४ केंद्रांच्या माध्यमातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी अद्याप गुदामांमधून केंद्रस्तरावर पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शाळांना पुस्तकांची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा शिक्षणविभाग अनभिज्ञ असून, शहरातील शाळांना पुस्तक वितरणासंदर्भात प्रभारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे समोर आहे.
---------------------
बालभारतीकडून पुरवठ्यास उशीर
कोरोनामुळे पुस्तकांची छपाई व वाहतूक प्रक्रियेत आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होऊ न शकल्याने बालभारतीकडूनच यावर्षी पुस्तकांचा पुरवठा उशिरा झाल्याचे पुस्तक वितरण विभागातील सूत्रांनी सांगितले. समग्र शिक्षण अभियानांतर्गत मिळणारी पुस्तके आता गुदामात पोहोचली असून, दोन दिवसांत ती सर्व केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सुमारे आठवडा भराच्या कालावधीत ही पुस्तके शाळांना उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
------------------------
एकात्मिकच्या पुस्तकांची अजूनही प्रतीक्षा
समग्र शिक्षण अभियानांतर्गत दिली जाणारी पुस्तके गुदामांपर्यंत उपलब्ध झाली आहे. परंतु, एकात्मिक पाठ्यपुस्तके अजूनही बालभारतीच्या कार्यालयास उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नाशिक भाग दोन व मालेगाव व निफाड तालुक्यांतील शाळांना पुस्तक ांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.