नाशिक शहरातील शाळा १५ मार्च पर्यंत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:36 PM2021-03-01T19:36:02+5:302021-03-01T19:38:17+5:30
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि.१) जारी केले आहेत.
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि.१) जारी केले आहेत.
राज्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे शाळांमध्ये साथ प्रतिबंधक उपाययोजना करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये तसेच शाळा बंदचा परीणाम विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेवर परीणाम होऊ नये याचा विचार करून गेल्या ४ जानेवारी पासून नववी ते बारावीचे वर्ग तर २७ जानेवारीपासून पाचवीचे ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती.
दरम्यान शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने नाशिक महापालिका क्षेत्रातील पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीचे केवळ इंग्रजी,गणित विज्ञान या विषयांसाठी सुरू राहातील ,परंतु त्यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक राहील, असे देखील नमूद करण्यात आले आहे.