नाशिक शहरातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार; महापालिकेच्या आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:09 PM2021-03-13T13:09:01+5:302021-03-13T13:09:13+5:30
गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
नाशिक - देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या पहिल्या दहा शहरात नाशिकचा समावेश असला तरी कठोर उपाय योजना केल्या जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी नाशिक शहरातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहतील अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
गृह विलगिकरणातील बाधित बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल त्याच बरोबर गुन्हे दाखल करण्यात येईल असेही आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. नाशिक मध्ये कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी तातडीने खाते प्रमुखांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. कोरोना बाबत उपाययोजना करण्यासाठी आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आली असून तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
दोन हेल्पलाईन नंबरही देण्यात येतील तसेच आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता पालिका कर्मचारी रस्त्यावर दिसतील असंही ते म्हणाले. नाशिक मधील सर्व शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहतील दहावी आणि बारावी मात्र पालकांच्या संमतीने सुरू राहू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले.