येवल्यात शाळा, कार्यालयांत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:19 AM2018-08-08T00:19:18+5:302018-08-08T00:20:10+5:30
येवला : राज्यव्यापी तीनदिवसीय संपात तालुक्यातील प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी सरकारी कार्यालयांसह शाळांमध्ये शुकशुकाट होता.

संपाबाबत विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे शाळेच्या वेळेत उपस्थिती दर्शविली. मात्र शिक्षक संपात सहभागी असल्याने मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीच परिपाठ घेतला. प्राथमिक शिक्षकांनी संप काळात पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन करून गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या राज्यव्यापी संपात तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षकांनी सहभागी होत कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सरकारी व निमसरकारी कार्यालयांत शुकशुकाट होता.