विज्ञानचा कटआॅफ घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:51 AM2019-07-13T01:51:27+5:302019-07-13T01:52:00+5:30

विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यंदा विज्ञान शाखेचा कटआॅफ घटला असून, वाणिज्य शाखेसाठी कटआॅफ वाढल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या सुमारे १४,८४५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. शनिवार (दि.१३) रोजी पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

Science cutoff dropped | विज्ञानचा कटआॅफ घसरला

विज्ञानचा कटआॅफ घसरला

Next
ठळक मुद्देअकरावी गुणवत्ता यादी : वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी लागणार कस

नाशिक : विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यंदा विज्ञान शाखेचा कटआॅफ घटला असून, वाणिज्य शाखेसाठी कटआॅफ वाढल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या सुमारे १४,८४५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. शनिवार (दि.१३) रोजी पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
महापालिकेला क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश यंदाही आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञानसाठीचे कटआॅफ घटला असून, शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ८७ ते ९१ टक्क्यांपर्यंत विज्ञानचे प्रवेश आले आहेत, तर वाणिज्य शाखेचा कटआॅफ ८१ ते ८७ दरम्यान राहिला. यंदा दहावीचा निकाल कठोर लागल्याने त्याचा परिणाम गुणवत्ता यादीवरही दिसून आला. मागीलवर्षी ९५ ते ९६ टक्क्यांवर असलेला विज्ञान शाखेसाठीचा कटआॅफ यंदा ८७ ते ९१ टक्क्यांवर आला आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी पहिल्या यादीनुसार २१,०२८ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली असून, त्यामध्ये पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४,८४५ इतकी आहे. अकरावीसाठी शहरातील ५९ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार इतक्या जागा असून, प्रवेशासाठी २५ हजार ६९० विद्यार्थ्यांनी भाग-१ मध्ये
अर्ज दाखल केले होते, तर भाग-२ मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१,०२८ इतकी होती.
कला शाखेसाठी ४७९०, वाणिज्य शाखेसाठी ४४३०, तर विज्ञान शाखेच्या ९१९० जागांसाठंी अलॉटमेंट जाहीर करण्यात आली. एमसीव्हीसीच्या १३२० जागांसाठीदेखील कटआॅफ लिस्ट जाहीर करण्यात आली. पहिल्या दहा महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची नावे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत. कला शाखेसाठी प्रथम दहा प्राधान्य क्रम नोंदविलेल्या २५६३, कॉमर्स ५६२९,सायन्स ६३९६ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी ल्लं२ँ्र‘.11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ल्ली३ या संकेतस्थळावर तपासावा. ४दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा
४पसंतीक्रम क्रमांक १ अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम ‘स्टुडंट लॉगिन’ मध्ये जाऊन ‘प्रोसिड’या बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. तरच त्यांचे नाव कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट होईल व त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश आॅनलाइन अपलोड करून प्रवेश समाविष्ट करावा व प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी.

Web Title: Science cutoff dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.