मालेगावसह परिसरात विज्ञान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:39+5:302021-03-01T04:17:39+5:30
प्राचार्य शिरोळे व पर्यवेक्षक बी. जी. शेवाळे यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
प्राचार्य शिरोळे व पर्यवेक्षक बी. जी. शेवाळे यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विज्ञान शिक्षक एस. बी. शेवाळे, आर. एन. काकळीज, पी. पी. निकम यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले. शिक्षक - शिक्षकेतर भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन वीरेंद्र निकम यांनी केले. योगेश बोरसे यांनी आभार मानले.
एलव्हीएच विद्यालय कॅम्प
मालेगाव : कॅम्पातील एल. व्ही. एच. माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पवार होते. त्यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक आर. एच. खान यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले. मुख्याध्यापक पवार यांनी विद्यार्थ्यांना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रामन इफेक्टबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक एम. पी. शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. एम. अहिरे यांनी केले. पी. पी. राजपूत यांनी आभार मानले.
===Photopath===
280221\28nsk_6_28022021_13.jpg
===Caption===
मालेगावी एलव्हीएच विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिमापूजनप्रसंगी मुख्याध्यापक दिनेश पवार. समवेत एम,पी. शिंदे, आर.एच. खान आदी