हिरे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 03:18 PM2019-11-24T15:18:28+5:302019-11-24T15:20:10+5:30
आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय शाळेत विज्ञान छंद मंडळ अंतर्गत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते
नाशिक : आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय शाळेत विज्ञान छंद मंडळ अंतर्गत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनासाठी अध्यक्ष स्थानी शाळेचे सहसमन्वयक सुभाष वाडेकर, प्रमुख पाहुणे विज्ञान तज्ञ माजी प्राचार्य डॉ. किशोर पवार, राजेश बडोगे इत्यादी उपस्थित होते. प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे डॉ. किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकातील विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १६५ प्रतिकृती तयार करून प्रदर्शनात सहभागी झाले होते. सोलर ऊर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रोबोट, मॅग्नेटिक लॉक, ड्रोन, व्हॅक्युम क्लिनर, प्रोजेक्टर, लिफ्ट टाईप कार पार्किंग असे अनेक उपकरणे तयार करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक सुनिल इंगळे, उपमुख्याध्यापक वाल्मिक ठाकरे, पर्यवेक्षक दिलीप देसले सूत्रसंचालन रमेश अहिरे व आभार पृथ्वीराज मगर यांनी केले.