सनराइज स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:19 PM2019-12-27T22:19:52+5:302019-12-27T22:20:45+5:30
श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्याहस्ते प्रतिमापूजन व फीत कापून कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली.
वटार : श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व फीत कापून कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली.
किकवारी खुर्द या गावाने स्वच्छतेसंदर्भात राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळविले तसेच महाराष्ट्रात एक वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या या गावातील शाळेने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य, पाणी व्यवस्थापन, शाश्वत कृषी पद्धती, औद्योगिक विकास, परिवहन आणि दूरसंचार, शैक्षणिक खेळ, गणितीय खेळ आदी विषयांवरील प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार करून प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यावेळी पालक, ग्रामस्थ व किकवारी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे संस्थापक केदा बापू काकुळते, अध्यक्ष किरण काकुळते, मुख्याध्यापक रोशन भामरे, यशवंत धोंडगे, पोपट पवार, जयवंत भामरे, मनोज जाधव, दीपक भामरे, कौतिक आहिरे, धनंजय देवरे, नारायण पवार, अमृत गावित, अरुण काकुळते, रोशन पवार, प्रवीण भामरे, एकनाथ पवार, अश्विनी काकुळते, मनीषा आहिरे, अश्विनी अहिरराव, रोहिणी खैरनार, अश्विनी पाटील, स्वाती सोनवणे, गायत्री सोनवणे, प्रीती बागुल, वैशाली पवार, पल्लवी पाटील उपस्थित होते़