नामपूर इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:19 PM2019-12-20T17:19:28+5:302019-12-20T17:21:05+5:30

नामपूर येथील मविप्र संचालित नामपूर इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले पाचवी ते सातवी प्राथमिक गटात २०,तर आठवी ते दहावीच्या माध्यमिक गटात २२ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन उच्च माध्यमिक विद्यालयाचे व ज्यु कॉलेज स्कूल कमिटीचे अध्यक्ष भाऊराव बापू सावंत व सदस्य दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

Science display at Nampur English School Higher Secondary School | नामपूर इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

नामपूर इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देविज्ञान प्रदर्शनात ओम सावंत,ओम खानापूर,आदित्य देसले यांनी बनविलेल्या लाय-फाय उपकरण व शुभम गायकवाड,शुभम अिहरे,यश सावंत यांनी मांडलेले रस्त्याद्वारे विद्दुत निर्मिती,तर धीरज सावंत याने बनविलेल्या पाणी शोषक यंत्र प्रदर्शनात मुख्य आकर्षण होती.



या वेळो ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदस्य नारायण सावंत ,एकनाथ शिंदे मुख्याध्यापक एस एम पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी. पगार,पर्यवेक्षक ए. यू. बागुल आदी यावेळी उपस्थित होते.


विज्ञान प्रदर्शनात क्लीन सिटी क्लीन व्हीलेज,पवन ऊर्जा यंत्र,डोंगर उतारावरील वळणावरील अपघात संरक्षक दिवे,रेन वॉटर हार्वेस्टिंग,स्मार्ट सिटी,टाकाऊ पासून टिकाऊ उपकरण क्र ेन,आधुनिक शेती,पेरिस्कोप, मोटार बोट,डिस्टन्स (अंतर)मोजणी यंत्र, या विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या.
या विज्ञान मेळावा यशिस्वते साठी विज्ञान शिक्षक पी एल ठाकूर,एच एन देवरे,एस के कोर,आर सी पाटील, बी के थैल,एस डी पगार,व्ही एस पाटील,के एस हिरे व प्रयोग शाळा परिचर नरेंद्र देसले यांनी परिश्रम घेतले.
परीक्षक म्हणून उप मुख्याध्यापक ए. डी. पगार यांनी काम पाहिले.
.
प्रास्ताविक पर्यवेक्षक ए यू बागुल यांनी केले तर आभार पी एल ठाकूर यांनी मानले.
फोटो ओळी
प्रदर्शनात लाय-फाय यंत्राची माहिती घेताना ज्यु कॉलेज कमिटीचे अध्यक्ष भाऊराव बापू सावंत,दीपक सावंत,नारायण सावंत नामपूर इंग्लिश स्कूल नामपूइ.(20 नामपूर इंग्लिश स्कूल)र चे मुख्याध्यापक एस एम पाटील,उपमुख्याध्यापक ए डी पगार ,सतीश कापडणीस

Web Title: Science display at Nampur English School Higher Secondary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.