स्वामी मुक्तानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:03 IST2019-12-15T19:03:29+5:302019-12-15T19:03:57+5:30
येवला येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वामी मुक्तानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपक गायकवाड, दत्तात्रय नागडेकर, अंबादास ढोले, चांगदेव खैरे आदी.
येवला : येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.
उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माला प्राचार्य दत्तात्रय नागडेकर, उपप्राचार्य अंबादास ढोले, चांगदेव खैरे उपस्थित होते. यावेळी ४८ विज्ञान प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
आपल्या प्रतिकृतीतून काही तरी वेगळं साकारण्यासाठी विद्यार्थी धडपड करीत होते. विज्ञान प्रदर्शन
यशस्वी करण्यासाठी नवनाथ साबळे, मधुकर ढोले, महेश जगदाळे,
माया हादगे,अमोल दुकळे, क्षितिज नाकील, पवन बागल, अरु ण थोरात, विशाल निहाळी आदींनी परिश्रम घेतले.