शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:51+5:302021-03-09T04:17:51+5:30

नाशिक: ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खासगी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये ...

The scope of vaccination in the city will increase | शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढवणार

शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढवणार

Next

नाशिक: ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खासगी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये लसीकरण बुथची संख्या वाढवावी. जेणेकरून लसीकरण मोहिमेला गती मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कोविड लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, डॉ. श्रीनिवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. अनंत पवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिका मालेगावच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढविणे गरजेचे असून, खासगी हॉस्पिटल व मान्यताप्राप्त संस्था येथे लसीकरण बुथची संख्या वाढविली तर ही मोहीम लवकरात लवकर पूर्ण होईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या लसीकरणाची टक्केवारी आरोग्य यंत्रणेच्या तुलनेत समपातळीवर आणण्यासाठी या शासकीय कार्यालयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून, योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिल्या.

देशभरासह जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड साथरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण मोहीम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील मान्यताप्राप्त संस्थांना लसीकरण मोहिमेच्या प्रवाहात समाविष्ट करून, लसीकरणाची व्याप्ती वाढवावी, असे निर्देश मांढरे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

बुथच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण ॲपच्या बाबतीत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती शासनाला सादर करण्यात यावी, जेणेकरून बुथच्या ठिकाणी एकाच वेळी होणारी गर्दी टाळता येईल, असेही मांढरे यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: The scope of vaccination in the city will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.