स्कॉर्पिओच्या धडकेत कामगार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:22 AM2017-09-08T00:22:30+5:302017-09-08T00:22:42+5:30

ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Scorpio drowned in labor | स्कॉर्पिओच्या धडकेत कामगार जागीच ठार

स्कॉर्पिओच्या धडकेत कामगार जागीच ठार

Next

पंचवटी : ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
रुपेश सुभाष भावसार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कलानगर, म्हाडा कॉलनीतील रहिवासी होते. ते ओझर येथील डीटीएल कंपनीत कामाला होते. बुधवारी रात्री ते सुटी झाल्याने स्प्लेंडरवरून ( एमएच १५, सीएक्स ३२०९) आडगाव मेडिकल फाटा रस्त्याने दिंडोरीरोडकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ (एमएच १५, बीएन ८५९५) या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेने भावसार हे रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनाच्या चालकाने वाहन सोडून पलायन केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव फाटा, के. के. वाघ तसेच जत्रा चौक येथे वर्दळ वाढल्याने रस्ता ओलांडणाºयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महामार्गावरील अनेक चौक धोकेदायक बनल्याने अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Scorpio drowned in labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.