भंगार बाजार व्यावसायिक : मिनी कमर्शिअल झोनची मागणीमनपावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:55 AM2017-11-10T00:55:13+5:302017-11-10T00:56:08+5:30

सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह परिसरात मिनी कमर्शिल झोन लागू करण्यासाठी नाशिक शहर अल्पसंख्याक कॉँग्रेस आणि युवक कॉँग्रेसच्या वतीने भंगार बाजार व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला.

Scrat market business: Demand for the mini-commercial zones | भंगार बाजार व्यावसायिक : मिनी कमर्शिअल झोनची मागणीमनपावर आक्रोश मोर्चा

भंगार बाजार व्यावसायिक : मिनी कमर्शिअल झोनची मागणीमनपावर आक्रोश मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देबी. डी. भालेकर हायस्कूलपासून सुरुवात मोर्चात महापालिका प्रशासनाविरुद्ध घोषणाफलकही लक्ष वेधून घेत होते

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील हटवण्यात आलेल्या भंगार बाजार व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह परिसरात मिनी कमर्शिल झोन लागू करण्यासाठी नाशिक शहर अल्पसंख्याक कॉँग्रेस आणि युवक कॉँग्रेसच्या वतीने भंगार बाजार व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला.
बी. डी. भालेकर हायस्कूलपासून भंगार बाजार व्यावसायिकांच्या मोर्चाला सुरुवात झाली. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, अल्पसंख्याक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शेख हनिफ बशीर आणि युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा महापालिकेवर नेण्यात आला. मोर्चात महापालिका प्रशासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. याशिवाय, व्यावसायिकांच्या हातात ‘भिक नको हक्क हवा, अन्याय नको न्याय हवा’, ‘मिनी कमर्शिअल झोन झालाच पाहिजे’, ‘पर्यायी जागा मिळालीच पाहिजे’, असे फलकही लक्ष वेधून घेत होते. यावेळी उद्ध्वस्त झालेल्या व्यवसायाच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा मिळावी, सातपूर-अंबड लिंकरोड येथे मिनी कमर्शिअल झोन लागू करावा, लिंकरोडवर व्यापाºयांना स्वत:च्या मालकी हक्काच्या जागेवर मिनी स्क्रॅप मार्केटला मान्यता द्यावी आणि मालकी हक्काच्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी शेड उभारण्यास परवानगी द्यावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी भंगार बाजार व्यावसायिकांनी प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेधही केला. या आंदोलनात नगरसेवक वत्सला खैरे, आशा तडवी तसेच कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचेसह भंगार बाजार व्यावसायिक सहभागी झाले होते.

Web Title: Scrat market business: Demand for the mini-commercial zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.