सातपूर राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:13 AM2021-09-13T04:13:00+5:302021-09-13T04:13:00+5:30
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर मौले यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जवळपास ४० इच्छुकांची बैठक घेण्यात आली. आगामी ...
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर मौले यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जवळपास ४० इच्छुकांची बैठक घेण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. मनोगत जाणून घेण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बाळासाहेब पाटील,विजय तुपलोंढे, समाधान तिवडे, श्रीकांत कदम, फ्रंटल अध्यक्ष नितीन निगळ, डॉ.अमोल वाजे, डॉ सुनील आंधळे, नीलेश भंदुरे, धनंजय रहाणे, ऋषीराज खरोटे, सिद्धांत काळे, पूनम शहा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक विभाग अध्यक्ष जीवन रायते यांनी केले.
इच्छुकांकडून प्रभागनिहाय माहिती घेऊन सातपूर विभागातून जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अमित कोथमिरे, मुन्ना कडलग,प्रवीण पाटील, प्रवीण अहिरे, रुपाली अहिरे, कल्पेश कांडेकर, सचिन उशीर, महेश आहेर, श्रीराम मंडळ, प्रवीण नागरे, दत्ताजी वामन, विश्वनाथ निकम, कपिल भावले, क्रांती पालवे, संदीप पवार, सचिन गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, पंकज भामरे, रामदास मेदगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.