पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:51 PM2019-03-12T13:51:33+5:302019-03-12T13:55:57+5:30

राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. 

With the scrutiny of the paper, the result of the election responsibility will be removed; | पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

पेपर तपासण्यासोबत निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील ;शिक्षक महासंघाचा इशारा

Next
ठळक मुद्दे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रक्रियेतून वगळण्याची मागणी शिक्षककांवर दहावी बारावी परीक्षांचे पेपर तपासण्याची जबाबदारीनिवडणुकीच्या कामामुळे दहावी बारावीचे निकाल लांबतील

नाशिक : राज्याच्या  माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियाच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. 
निवडणुकीच्या कामात शिक्षक-प्राध्यापकांना गुंतवल्यामुळे निकाल उशीरा लागण्याची शक्यता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे मुल्यमापण प्रक्रियेत व्यस्त असलेले जिल्ह्यातील ३ हजार प्राध्यापक-शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी निवडणूक आयोग, राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मुल्यमापणाच्या कामास यंदा आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. इकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असतांना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मुल्यमापण प्रक्रियेला गती दिली जाते आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचेही पेपर तपासण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या कामात बहूतांश शिक्षक व्यस्त असून उर्वरित शिक्षकांवर दहावी -बारावीच्या परीक्षा संपतात अकरावीच्या परीक्षा व प्रवेश प्रक्रियेचे काम लागणार आहे.अशा स्थितीत लोकसभा निवडणुक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक अडकले तर मुल्यमापण प्रक्रियेवर परिणाम होऊन निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण मंडळासह निवडणूक प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेतील शिक्षकांवरील जबाबदारीविषीय प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
आठ दिवस उशीराने सुरुवात
शिक्षकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे यंदा बारावीचे पेपर तपासणीला आठ दिवस उशीराने सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३ हजार शिक्षण पेपर तपासणीचे काम करत आहे. बारावीचे पेपर तपासणी सुरू असतांनाच अकरावीची परिक्षा घेऊन त्यांचाही निकाल जाहिर करावा लागणार आहे. तर दहावीची परीक्षा संपताच अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू होते. अशावेळी शिक्षकांना मतदान प्रक्रियेचे काम दिल्यास बारावीचे पेपर तपासणी आणि निकालावर परिणाम होऊन निकाल लांबू शकतात.-प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.

 

Web Title: With the scrutiny of the paper, the result of the election responsibility will be removed;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.