मूर्तिकाराकडे हवी जिद्द अन् चिकाटी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:24 AM2018-09-09T00:24:16+5:302018-09-10T17:48:20+5:30

सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शाडूमातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न भाविक करतात. परंतु शाडूमातीच्या मूर्ती घडविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे मूर्तिकार लोंढे कुटुंबीय नाशकात प्रसिद्ध आहे. केवळ मूर्तीकलाच नव्हे तर धातुकला, शिल्पकला यात देशभरात नावलौकिक मिळविलेले शिल्पकार संदीप लोंढे यांच्याशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद..

Sculptor wants to stay alive ...! | मूर्तिकाराकडे हवी जिद्द अन् चिकाटी...!

मूर्तिकाराकडे हवी जिद्द अन् चिकाटी...!

googlenewsNext
ठळक मुद्देजिद्द आणि चिकाटी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

मुकुंद बाविस्कर 
सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शाडूमातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न भाविक करतात. परंतु शाडूमातीच्या मूर्ती घडविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे मूर्तिकार लोंढे कुटुंबीय नाशकात प्रसिद्ध आहे. केवळ मूर्तीकलाच नव्हे तर धातुकला, शिल्पकला यात देशभरात नावलौकिक मिळविलेले शिल्पकार संदीप लोंढे यांच्याशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद..

 मूर्तिकला आणि शिल्पकला या क्षेत्राकडे आपण कसे वळालात?
- नाशिक शहराला धातुकला, चित्रकला, मूर्तिकला आणि शिल्पकलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. आमच्या लोंढे घराण्यालादेखील मूर्तिकला आणि शिल्पकलेचा असाच वारसा लाभलेला आहे. आमचे आजोबा सीताराम विठ्ठल लोंढे हे कर्मवीर दादासाहेब फाळके यांच्या फिल्म कंपनीसाठी या कलेचे काम करत. त्यानंतर माझे वडील कृष्णाजी लोंढे आणि काका सुधाकर लोंढे यांनी कलेचा हा वारसा जोपासला. त्यामुळे रोजच या कलेचे दर्शन होत असे. त्यातील बारकाव्यांचा कळत-नकळत अभ्यास करत गेलो. त्यातून आपोआपच या कलेकडे वळालो.
 एकेकाळी गणेशोत्सवातील श्रींच्या मूर्ती आणि देखावे हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात असत. या उत्सवात असे नेमके काय वेगळेपण आहे?
- साधारणत: १९७० ते १९९० या काळात नाशिकमधील गणेशोत्सव हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होत असे. गणेशोत्सवात कोणती आरास करावयाची याबाबत गुप्त खलबते होत असत. मग मूर्तिकारांना आधीच कशा प्रकारची मूर्ती घडवायची याची संकल्पना सांगण्यात येई तर काही वेळा स्वत: मूर्तिकारालाच वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती बनविण्याचे अधिकार सार्वजनिक मंडळांकडून दिले जात. त्यातून रात्रंदिवस मेहनत करून आगळीवेगळी संकल्पना घेऊन मूर्तिकार मूर्ती घडवित असत.
मूर्तिकला आणि शिल्पकला या क्षेत्रात कालानुरूप कसे बदल होत गेले?
- पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्ही प्रकाराने ही कला साधता येते तर कधी दोन प्रकारांचा संगम करून नवनिर्मिती घडवावी लागते. गणेशोत्सवाचे स्वरूपदेखील बदलत चालले आहे. पूर्वी वेगवेगळ्या ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांना खूप महत्त्व होते. आता आकर्षक विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. आम्ही फक्त शाडूमातीच्या मूर्ती बनवितो. शाडूमातीच्या मूर्तीकडे लोक पुन्हा वळू लागले आहेत. प्रत्येकालाचा अशी मूर्ती बनविता आली आणि त्यांनी आपापल्या घरी या मूर्तीची स्थापना केली तर एक वेगळेच समाधान मिळेल.
 दोन दशकांचा शिल्पकलेचा प्रवास कसा होता?
- शिल्पकला ही खूप अवघड कला आहे. देशभरात आम्ही अनेक शिल्पे व पुतळे उभारली आहेत. या क्षेत्रात काम करताना राज्य शासनाचा कला पुरस्कार मिळाला. या क्षेत्रात कष्ट, मेहनत खूप आहे. पूर्वी नाशिकला एकच चित्रकला महाविद्यालय होते. आता चार-पाच महाविद्यालये झाली आहे. कलाक्षेत्राकडे युवकांचा कल वाढतो आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणे अवघड नाही. परंतु त्यासाठी असावी लागते आवड; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे जिद्द आणि चिकाटी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

Web Title: Sculptor wants to stay alive ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला