रेखाकला परीक्षेपासपासूनआठ विद्याथी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:36 PM2018-09-28T17:36:32+5:302018-09-28T17:36:46+5:30
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शासनाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शासकीय रेखाकला परिक्षा घेण्यात येतात.त्यासाठी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या परिक्षेत सहभाग असतो.या परिक्षेत एलिमेंट्री - दोन पेपर (दोन दिवस) त्यानंतर एंटरिमजिएट - दोन पेपर (दोन दिवस) असे चार पेपर चिञकलेचे असतात. दहावीची परिक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१मार्क दिले जातात म्हणजे ३टक्केया परिक्षेत पास झाल्यानंतर मिळतात.त्यामुळे नापास होणारा विद्यार्थी कींवा पुढच्या शिक्षणासाठी टक्केवारी कमी पडल्यास या परीक्षेचा फायदा होतो.त्यासाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड, नांदगाव- व्हि.जे.हायस्कूल, तसेच ग्रामीण भागासाठी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालय अशा तीन ठीकाणी केंद्र ठरविण्यात आले आहे.पैकी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालयात तालुक्यातील एकुण सोळा शाळेतील विद्यार्थी परीक्षार्थी आहेत.त्यासाठी प्रत्येक शाळेच्या कलाशिक्षक व मुख्याध्यापक यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची परिक्षा फी ६०रूपये जमा करून २२आॅगष्टपर्यंत आॅनलाईन फार्म भरणे अनिवार्य होते.मात्र साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने पाचवी ते दहावीच्या एकुण १९७ विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी जमा करून ती मुदतीच्या आत भरली नसल्याचेपालकांनीसांगितले.शिवाय एक महिन्यांपूर्वी हेअर्जभरणारे शिक्षक आजारी पडल्याने ते गैरहजर आहेत.त्यामुळे सदर विषयाचा एकही तास झाला नसून कोणी मार्गदर्शन देखिल न करता अचानक कालच या परीक्षेची माहिती शाळेत मिळाल्याने शाळेत खळबळ उडाली.मात्र गावातील नितीन ठुबे या शिक्षकांनी त्वरित सदर सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून एकुण ९९ विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसविण्याचा प्रयत्न केला.परंतू आठ विद्यार्थ्यांनी पैसे भरूनही या परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तसेच यापूर्वी देखिल सन २०१५ - २०१६व २०१६-२०१७ या वर्षी देखिल शाळेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला असून त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केल्याने एकुण५५विद्यार्थी या२१गुण ( 3टक्के) मिळविण्यापासून वंचित राहिल्याने अनेकांना शिक्षणासाठी अडचणी आल्याचे काहीमाजी विद्यार्थ्यांनी सांगितले.