ठेंगोडा शिवारात बिबट्याचा धुमाकुळ, दोन वासरे फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 04:30 PM2018-10-18T16:30:11+5:302018-10-18T16:30:24+5:30
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील शेतकरी संजय माधवराव शिंदे यांच्या मालकीचे दोन वासरावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकर्याच्या व पशुधन मालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने या बिबट्याचा त्विरत बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठेंगोडा परिसरातील सावकी फाटा शिवारात बिबट्याने धुमाकुळ घालता असुन रोजच राञीच्या वेळी शेतकर्यांना अनेकदा दर्शन झाले आहे. तसेच काही दिवसापुर्वी येथील शेतकरी बाळु येवला यांच्या मळ्यातील गाईच्या वासराला फस्त केल्याची घटना घडली होती.त्यानंतर या परिसरात रोज राञीच्या सुमारास या परिसरात शेतकºयांना बिबट्या दिसल्याचे सांगत होते .आज दि. १८ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास येथील शेतकरी संजय माधवराव शिंदे यांच्या शेतातुन गायीचे दोन वासर ओढुन नेऊन फस्त केली आहेत. यात एक वासरू मृत अवस्थेत सापडले तर दुसरे वासरु बिबट्याने ओढुन नेले आहे.याठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे देखील आढळुन आले आहेत.परिसरात साधारपणे दोन बिबटे असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना आहे. यावेळी वनविभागाचे वनकर्मचारी तसेच तलाठी मनोज भामरे , जयेश सोनवणे यांनी येऊन पंचनामा केला आहे. याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावण्यात येवुन बंदोबस्त करावा. अशी मागणी सरपंच सखुबाई शिंदे यांच्यासह येथील शेतकरी मधुकर व्यवहारे ,प्रदिप शेवाळे,वसंत शिंदे,बाळु येवला ,संजय शिंदे ,अनंत शेवाळे,सुधाकर पगार ,पिंटु सोनवणे यांनी केली आहे.