लोहशिंगवे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:31 PM2019-04-04T14:31:34+5:302019-04-04T14:31:41+5:30
नांदूरवैद्य : लोहशिंगवे परिसरात जुंद्रे वस्तीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
नांदूरवैद्य : लोहशिंगवे परिसरात जुंद्रे वस्तीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एकाच महिन्यात तीन ते चार वेळा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन गायी, एक वासरू, शेळ्या, कुञे आदी प्राण्यांवर हल्ला चढवत त्यांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या असून बुधवारी देखील जुंद्रे वस्तीमध्ये राञी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा हल्ला करत शांताराम शिवराम जुंद्रे या शेतकर्याची एक जर्सी गाय फस्त केली आहे. या एकामागोमाग बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून बिबट्याचा वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.सदर घटनेची माहिती सरपंच संतोष जुंद्रे यांनी वनविभागाला दिली आहे. लोहशिंगवे येथील जुंद्रे वस्ती परिसरात गेली कित्येक दिवस बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने त्वरीत या परिसरात नागरिकांच्या मागणीवरून पिंजरा लावला माञ पिंजरा लावुन पंधरा ते वीस दिवस होवून देखील या पिंजर्यात बिबट्याला कैद करण्यात वनविभागाला यश मिळाले नाही.या परिसरातील बहुतेक शेतकरी आपली जनावरे उघड्यावरच बांधत असल्यामुळे बिबट्या सहज येवुन हल्ला करून जातो.यासाठी जनावरांना बंदिस्त शेडमध्ये बांधणे गरजेचे आहे.बिबट्या पकडण्यास वनविभागाला यश मिळत नसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.