दहा हजार देण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:18+5:302021-03-26T04:15:18+5:30
जगताप बंगला, केसर बंगलो येथे राहणारे सचिन ओमप्रकाश सोमानी यांचा नाशिक रोड मालधक्क्यावर वाहूतक ठेका आहे. सोमाणी हे सोमवारी ...
जगताप बंगला, केसर बंगलो येथे राहणारे सचिन ओमप्रकाश सोमानी यांचा नाशिक रोड मालधक्क्यावर वाहूतक ठेका आहे. सोमाणी हे सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या कार्यालयात दोघा कर्मचाऱ्यांसोबत दैनंदिन काम करत होते. यावेळी तेथे संशयित आरोपी ऋषिकेश ऊर्फ भारत अशोक निकम, नदीम ऊर्फ बडे पप्पू पठाण व त्यांचे दोन साथीदार आले. त्यांनी सोमाणी यांच्याकडे दहा हजार रुपये मागितले. सोमाणी यांनी त्यांना ‘कसले पैसे मागता, माझ्याकडे पैसे नाहीत,’ असे सांगितले. यावेळी हल्लेखोरांनी ‘सिद्धार्थ धनेधर, जॉन केरला, सागर म्हस्के, अशी आमची गँग आहे. सागर म्हस्के हा जेलमध्ये असून, त्याचा जामीन करण्यासाठी पैसे द्या,’ असे संशयित ऋषिकेश, नदीम पठाणने सांगितले. सोमाणी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ऋषिकेशने त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढून सोमाणी यांच्यावर वार केला. सोमणी यांनी वार हाताने अडविल्याने हाताला मोठी जखम झाली, तर नदीम पठाणने सोमाणी यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची दोन तोळ्यांची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतली, तसेच त्यांच्या दोघा साथीदारांनी ‘तुम्ही जर पोलिसांकडे तक्रार केली, तर जिवंत ठेवणार नाही...’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चौघा हल्लेखोरांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---इन्फो----
कामगारांत भीती; दोघांना अटक
मालधक्क्यावर व्यापाऱ्यावर अचानक हल्ला झाल्याने कामगारांमध्ये घबराट पसरून सर्वांचीच पळापळ झाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित ऋषिकेश निकम व नदीम पठाण यांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना मंगळवारी नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
--
फोटो- आर वर २३सोमाणी नावाने सेव्ह.
===Photopath===
230321\115623nsk_40_23032021_13.jpg
===Caption===
जखमी सोमाणी