ओझरला मुख्य रस्ता वगळता सर्व प्रवेशद्वार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:59+5:302021-04-10T04:14:59+5:30

जिल्ह्यातील निफाड तालुका व ओझर गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून, ओझर गावात सातशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गावातील कोरोनाची ...

Seal all entrances except the main road to Ozark | ओझरला मुख्य रस्ता वगळता सर्व प्रवेशद्वार सील

ओझरला मुख्य रस्ता वगळता सर्व प्रवेशद्वार सील

Next

जिल्ह्यातील निफाड तालुका व ओझर गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून, ओझर गावात सातशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गावातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, तहसीलदार व ओझर नगर परिषदेचे प्रशासक शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, यतीन कदम यांच्यात बैठक झाली. यावेळी ओझर गावातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली त्या अनुषंगाने गावातील रस्ते व प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे ओझर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ओझरमधील मुख्य रस्ता वगळता इतर सर्व रस्ते व प्रवेशद्वार बंद केले आहेत.

कोट....

ओझर गावातील रस्ते बंद केल्याने गावातील व उपनगरातील नागरिकांची गैरसोय होणार असल्याची प्रशासनाला जाणीव आहे; परंतु कोरोना आजार एकमेकांच्या संपर्कात आल्याने जास्त वाढतो, या कारणाने गावातील लोकांचा कमीतकमी संपर्क होऊन रुग्ण संख्या कमी व्हावी, यासाठी हा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी घरी सुरक्षित राहून प्रशासनाला मदत करावी.

- शरद घोरपडे, प्रशासक, ओझर नगर परिषद.

०९ ओझर रोड सील

===Photopath===

090421\09nsk_28_09042021_13.jpg

===Caption===

०९ ओझर रोड सील

Web Title: Seal all entrances except the main road to Ozark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.