मालेगाव शहरासह परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:46 PM2020-04-10T22:46:37+5:302020-04-10T22:47:29+5:30
मालेगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन जागे असून, संचारबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात येऊन उपाययोजना करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन जागे असून, संचारबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात
येऊन उपाययोजना करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मालेगाव येथे बैठक आटोपून आणि संबंधित यंत्रणांना सूचना देऊन परतताच शहरात नव्याने कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रशासन कामाला लागले आहे. शासकीय यंत्रणेने लॉकडाउनची आणखी कडक अंमलबजावणी केल्याने दिवसभरात रस्त्यावर शुकशुकाट होता. गुरुवारी शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने बंदोबस्त वाढवून परिसर सील करण्यात आला. याशिवाय नव्याने मिळून आलेल्या चार कोरोनाबाधित रुण राहत असलेला परिसर शुक्रवारी सील करण्यात येऊन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान गुरुवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या परिसरात औषधांची फवारणी करून या कोरोनाबाधितां रुग्णांच्या कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांना दिलावर हॉलमध्ये क्वॉरण्टाइन केले ्रआहे. शुक्रवारी ६१ जणांचे नमुने घेण्यात आले. या कोरोना रुग्णांमध्ये एक चांदवड, तर चार मालेगावचे रहिवासी आहेत.
संपर्कात आलेल्यांचा शोध
मालेगाव शहरात पाच नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात
आला तसेच त्यांचे कुटुंबीय व बाधित रुग्णांच्या दूरचे संबंधित नातेवाइकांचा शोध घेतला जात आहे. संबंधितांना पुढील १४ दिवस
होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
बैठकीला कृषिमंत्री दादा भुसे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा उपस्थित होते. ९८ जणांचे अहवाल बाकी गुरुवारी तीन डॉक्टर्स, २७ नर्सेस आणि इतर अशा ३७ जणांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. तसेच शुक्रवारी आढळून आलेल्या पाच रुग्णांच्या नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा ६१ जणांचे नमुने आज घेण्यात आले आहे. तेही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अशा एकूण ९८ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहे. संपर्कातील व्यक्तींचा शोधमालेगावी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांसह शुक्रवारी नव्याने सापडलेल्या चारही कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांना विलगीकरन कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.