घोटीत दोन दुकानांना लावले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 07:17 PM2021-03-25T19:17:51+5:302021-03-25T19:18:22+5:30
घोटी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामीण भागातही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता इगतपुरी तालुक्यात संयुक्त कारवाई मोहीम सुरू केली आहे. नियमांची पायमल्ली व उल्लंघन कारणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दुकाने सील, दंडात्मक कारवाई केली जात आहे. घोटी दोन दिवसात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दुकाने सील करण्यात आली तर उर्वरितांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

या अचानक सुरु झालेल्या मोहिमेचा दुकानदार व नागरिकांनी धसका घेतला असला तरी अद्यापही विनामास्क वावरणारे नागरीक व गर्दी कारणाऱ्यांविरुद्ध गुरुवारिी (दि.२५) दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरूच होती. जिल्ह्यात खुद्द जिल्हाधिकारी यांनी भेटी देऊन दुकाने सील करत असल्याने आता तालुका पातळीवरही यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोरोना समूह संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार घोटी शहरातील दुकानदारांवर तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, ग्रामपालिका घोटी यांच्या संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या मोहिमेत बुधवारी (दि.२४) सायंकाळी सात वाजेनंतर दोन दुकाने सील करण्यात आली तर सायंकाळी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मास्क न वापरणे, वेळेत दुकान बंद न करणे, दुकानात गर्दी ठेवणे यांसह राज्य शासनाच्या नियमांची पायमल्ली कारणाऱ्यांविरुद्ध सलग दोन दिवस ही मोहीम चालू आहे. दरम्यान या मोहिमेत उपनिरीक्षक संजय कवडे, ग्रामविकास अधिकारी रविंद्र धुंदाळे, मंडळ अधिकारी शाम बोरसे, आदी अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून बहुतांश ठिकाणी गर्दी जास्त होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांनी प्रादुर्भाव थांबवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे अन्यथा नियमांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, इगतपुरी.