५५ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:35 PM2020-10-22T19:35:55+5:302020-10-23T00:04:27+5:30

ओझरटाऊनशिप : ओझर पोलिस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत सापडलेल्या तसेच विविध गुन्हयात जप्त केलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहने पोलिस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून असल्याने आवाराच्या सुभोभिकरणास अडथळा निर्माण झाला आहे. अशा पंचावन्न बेवारस वाहन मालकांचा पोलीसांनी शोध लावला असून त्या मालकांनी त्यांची वाहने ओळख पटवून घेऊन जावीत अन्यथा वाहनांचा लिलाव करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Search for 55 unattended vehicle owners | ५५ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध

५५ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध

googlenewsNext
ठळक मुद्देओझर : वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

ओझरटाऊनशिप : ओझर पोलिस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत सापडलेल्या तसेच विविध गुन्हयात जप्त केलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहने पोलिस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून असल्याने आवाराच्या सुभोभिकरणास अडथळा निर्माण झाला आहे. अशा पंचावन्न बेवारस वाहन मालकांचा पोलीसांनी शोध लावला असून त्या मालकांनी त्यांची वाहने ओळख पटवून घेऊन जावीत अन्यथा वाहनांचा लिलाव करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, अधिक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये ओझर पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षापासून पडून असलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील ५५ वाहने त्या वाहनाच्या मालकांनी कागदपत्रांसह वाहनाची ओळख पटवून वाहने घेऊन जावीत असे आवाहन ओझर पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने तसेच वाहनांचे मालक सापडत नसल्याने बकाल अवस्थेतील वाहनांमुळे पोलिस स्टेशन आवार अतिशय खराब झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांना वाहनांचे मालक शोधण्याचे काम दिले आहे. त्यानुसार पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी योग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ५५ वाहनांच्या बेवारस वाहनांचा शोध लावला आहे. या कामासाठी पोलीस उपनिरिक्षक अजय कवडे, नाईक खांडवी, बाळासाहेब पानसरे, बाळासाहेब बागडे आदिंनी परिश्रम घेतले.

अनेक वर्षांपासून विविध गुन्हयात जप्त केलेली व न्यायालयीन प्रक्रियेमुळे दुचाकी चार चाकी वाहने बेवारस स्थितीत पडून असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात बकाल पणा वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला असून वाहन धारकांनी कागद पत्रांसह ओळख पटवून ही वाहने घेऊन जावीत. त्यासाठी ओझर पोलीस ठाणे येथे प्रत्यक्ष भेटावे.
- भगवान मथुरे, पोलिस निरिक्षक.

Web Title: Search for 55 unattended vehicle owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.