निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा लागणार शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:19+5:302021-02-09T04:16:19+5:30
शासनाने ऑगस्टमध्येच यााबाबतचे आदेश काढले होते. त्यानुसार राज्यात निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. संजय गांधी तसेच श्रावणबाळ ...
शासनाने ऑगस्टमध्येच यााबाबतचे आदेश काढले होते. त्यानुसार राज्यात निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. संजय गांधी तसेच श्रावणबाळ अशा योजनांमधून निराधारांना लाभ दिला जातो. गेली अनेक वर्षे लाभार्थी लाभ घेत असले तरी आता त्यांना सर्व प्रकारची माहिती स्वता: उपस्थित राहून द्यावी लागणार आहे. त्यामध्ये हयातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आणि बँक आधार लिकिंग द्यावे लागणार आहे. लाभाचे बँक खाते आणि आधार लिंक बँक खाते यांची माहिती निराधार योजना कार्यालयात उपस्थित राहून द्यावी लागणार आहे. अपुरी माहिती सादर करणाऱ्यांना किंवा समाधानकारक माहिती दिली नाही तर अशा लाभार्थ्याना योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे.
या मोहिमेतून बोगस लाभार्थी समोर येणार आहेत तर मयत लाभार्थ्यंची नावे आपोआपच कमी होणार आहे. हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ही महत्त्वाची कागदपत्रे या मोहिमेत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
--इन्फो--
लाभार्थी कुठल्या योजनेचे किती?
संजय गांधी योजना: ३५,५८३
श्रावणबाळ योजना: ०१,०५,६७२
इंदिरा गांधी योजना: ७०,९५०
---इन्फो---
संजय गांधी योजना (निराधार)
निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादी.
संजय गांधी योजना (अनाथ)
या योजनेंतर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा.
श्रावणबाळ योजना: राज्यातील ६५ व ६५ वर्षावरील निराधार वृद्ध व्यकतींना मासिक निवृत्तीवेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन येाजना राबविण्यात येते.
संजय गांधी योजना : (घटस्फोटित) निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटित महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या.