ठाणगावच्या युवकासाठी शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:09 AM2019-08-01T01:09:02+5:302019-08-01T01:10:08+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरू असून, ग्रामस्थ व शासकीय पातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

Search campaign for youth of Thangaon | ठाणगावच्या युवकासाठी शोधमोहीम

ठाणगावच्या युवकासाठी शोधमोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थ व शासकीय पातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरू असून, ग्रामस्थ व शासकीय पातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास ठाणगाव जवळील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस असणाºया गण्याडोह या बंधाºयात युवक पडल्याचे जनावरे चारणाºया गुराख्याने पाहिले होते. ठाणगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस सरू असल्याने म्हाळुंगी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्या पाण्यात उंबरदरी धरणही ओव्हरफ्लो झाल्याने पाणी पुढे म्हाळुंगी नदीला मिळाल्याने नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. सदर युवक कोण याबाबत कोणालाच माहिती नसल्याने म्हाळुंगी नदीपात्रात पडलेल्या युवकाचे नाव समजू शकले नव्हते. ठाणगावजवळील काळेवाडी येथील युवक सावळेराम काशीनाथ मेंगाळ मंगळवारपासून घरी आला नसल्याने नदीपात्रात पडलेला युवक हा काळेवाडी येथील असल्याचा संशय आहे. त्यामुळे ठाणगाव (काळेवाडी) येथील ग्रामस्थ गण्याडोहापासून पुलाच्या बंधाºयापर्यंत शोध घेत आहे.

Web Title: Search campaign for youth of Thangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात