आघाडीकडून सेनेविरोधात सक्षम उमेदवाराचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:07 AM2019-07-03T01:07:14+5:302019-07-03T01:09:49+5:30
सिन्नर : लोकसभा निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या विधानसभेला भाजप, शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. यावेळी आघाडी व युती झाल्यास संभाव्य उमेदवार कोण असतील यावर चर्चा सुरू आहे. युती झाल्यास विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे त्यांच्याविरोधात आघाडीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. विद्यमान आमदार वाजेंविरोधात ऐनवेळी आघाडीकडून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारीसाठी गळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजानंतर सर्वाधिक मते असणाऱ्या वंजारी समाजाचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
शैलेश कर्पे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : लोकसभा निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या विधानसभेला भाजप, शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. यावेळी आघाडी व युती झाल्यास संभाव्य उमेदवार कोण असतील यावर चर्चा सुरू आहे. युती झाल्यास विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे त्यांच्याविरोधात आघाडीकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. विद्यमान आमदार वाजेंविरोधात ऐनवेळी आघाडीकडून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारीसाठी गळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजानंतर सर्वाधिक मते असणाऱ्या वंजारी समाजाचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघाने आजपर्यंत पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणाला महत्त्व दिल्याचे अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, त्यापेक्षा तो कोणत्या गटाचा यावरच निवडणुकीचे निकाल लागल्याचे दिसून आले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तरीही खरी लढत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे व भाजपचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यातच झाली होती. त्यात शिवसेनेच्या वाजे यांनी बाजी मारली होती. कॉँग्रेस, राष्टÑवादी या उमेदवारांसह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते, तर मनसेला उमेदवारही मिळाला नव्हता.
गेल्या पाच वर्षांत शिवसेनेत पक्षांतराच्या घडामोडी घडल्या नसल्या तरी कोकाटे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली होती. त्यामुळे कोकाटे सध्यातरी कोणत्याच पक्षात नाही. शिवसेनेकडून विद्यमान आमदार वाजे यांना उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांचे पती उदय सांगळे यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत येणे सहाजिक आहे. सेनेचे उमेदवार वाजे यांना लढत देण्यासाठी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडे सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जाणे स्वाभाविक आहे. कॉँग्रेसकडून तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्यासह ऐनवेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे उमेदवार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोकाटे यांनी २००९ च्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाकडून निवडणूक जिंकली होती. राष्टÑवादी कॉँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे यांची नावे चर्चेत आहे. भाजप व मनसेच्या गोटात सध्यातरी शांतता आहे. बहुजन वंचित आघाडीनेही सिन्नर मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना-भाजप युती न झाल्यास भाजपकडून ऐनवेळी महिला व बाल कल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय उदय सांगळे यांनाही उमेदवारीसाठी गळाला लावण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. किंवा पुन्हा माजी आमदार माणिकराव कोकाटे अथवा त्यांची कन्या व भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनाही रिंगणात उतरवले जाऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे आघाडीच्या गोटात जातात की युती न होण्याची वाट पाहून भाजपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात याची उत्सुकता असणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोकाटेंना सिन्नर मतदारसंघात मिळालेली ९१ हजार मते अपक्ष उमेदवारीसाठीही खुणावू शकतात. आघाडी व युतीच्या भवितव्यावरच सिन्नर मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहे. तूर्त या मतदारसंघात आघाडी मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येते. वाजे यांची दावेदारी निश्चित
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती जवळपास शक्य मानली जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारीसाठी दावेदारी निश्चित मानली जात आहे. आघाडीत वंचित आघाडीला सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. वंचित आघाडीचा समावेश झाल्यास काही प्रमाणात समिकरणे बदलू शकतात. ..तर माणिकराव आघाडीचे उमेदवार
गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपकडून उमेदवारी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी लोकसभेला बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली होती. आता विधानसभेला युती आणि आघाडी झाल्यास कोकाटेंना युतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही म्हणूत ते आघाडीकडून उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. २०१४ चा निकाल
राजाभाऊ प्रकाश वाजे (विजयी)
मते : १,०४,०३१ (शिवसेना)
माणिकराव शिवाजीराव कोकाटे
मते : ८४,४७७ (भाजप)
संपत काळे
मते : ३,३१९ (कॉँग्रेस)
शुभांगी सुरेश गर्जे
मते : २,०५२ (राष्टÑवादी कॉँग्रेस)
शशिकांत गायकवाड
मते : १,५२० (बसपा)
विजय सानप
मते : ४७७ (रिपाइं, गवई गट)