मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:22 AM2019-10-06T00:22:08+5:302019-10-06T00:22:46+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भाव’ आला आहे.

Search for independents to prevent vote split | मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू

मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू

Next
ठळक मुद्देअधिकृत उमेदवारांना भेटण्याची टाळाटाळ सुरू

नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भाव’ आला आहे.
शुक्रवारी (दि.५) पंधरा मतदारसंघात एकूण २४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात अपक्ष आणि बंडखोरांचा भरणा अधिक होता. शनिवारी छाननीनंतर २१२ उमेदवारांचेच अर्ज शिल्लक राहिले आहेत. तथापि, ज्यांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशा बंडखोर आणि अपक्षांमुळे प्रमुख पक्षीय उमेदवारांना मतविभागणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांना माघारीसाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अपक्षांनी आपण प्रचारात आहोत, नंतर भेटतो असे सांगून अधिकृत उमेदवारांना भेटण्याची टाळाटाळ सुरू केली आहे तर दुसरीकडे अनेकांचा भाव वाढला आहे.

Web Title: Search for independents to prevent vote split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.