सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला बेपत्ता मुलाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:26 IST2020-10-27T00:26:16+5:302020-10-27T00:26:16+5:30

सिडको : राणेनगर येथील रिहवासी असलेला समीर शेख हा आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या पालकांना लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात येऊन तक्र ार दिली. यानंतर तत्काळ अंबड पोलिसांच्या व्हॉट्स??प ग्रुपवर समीरचा फोटो व्हायरल केला. यामुळे गस्तीपथकासह बीट मार्शलपर्यंत समीरचा फोटो जाऊन पोहोचला. यामुळे समीरचा अवघ्या दोन तासांत शोध लागला.

Search for missing child taken through social media | सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला बेपत्ता मुलाचा शोध

सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला बेपत्ता मुलाचा शोध

ठळक मुद्देसमीरचा अवघ्या दोन तासांत शोध लागला.

सिडको : राणेनगर येथील रिहवासी असलेला समीर शेख हा आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या पालकांना लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात येऊन तक्र ार दिली. यानंतर तत्काळ अंबड पोलिसांच्या व्हॉट्स??प ग्रुपवर समीरचा फोटो व्हायरल केला. यामुळे गस्तीपथकासह बीट मार्शलपर्यंत समीरचा फोटो जाऊन पोहोचला. यामुळे समीरचा अवघ्या दोन तासांत शोध लागला.
राणेनगर येथे राहणार्या मोयोद्दीन शेख यांचा मुलगा समीर हा अचानक बेपत्ता झाला होता. पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. शेख यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली. यावरून गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, पोलीस, निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस नाईक पी. एन. परदेशी, शिपाई आदिनाथ बारगजे, विजय जगताप यांनी सोशल मीडियावर समीरचा फोटो व्हायरल केला.

Web Title: Search for missing child taken through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.