मतदारयादीत नावांची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:32 AM2019-10-22T00:32:22+5:302019-10-22T00:33:11+5:30

Maharashtra Assembly Election 2019 शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विविध मतदारसंघांमध्ये नागरिकांना मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोबाइल अ‍ॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी मदत केली.

 Search for names in voter list | मतदारयादीत नावांची शोधाशोध

मतदारयादीत नावांची शोधाशोध

Next

नाशिक : शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विविध मतदारसंघांमध्ये नागरिकांना मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोबाइल अ‍ॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी मदत केली. शहरातील विविध भागांत मतदार यादीत नाव नसल्याची मतदारांनी तक्रार केली. परंतु यातील बहुतेक मतदारांना मोबाइल अ‍ॅपमुळे दिलासा मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बेसावध असलेल्या मतदारांना सोमवारी मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागली. कार्यकर्त्यांनी मोबाइल अ‍ॅपच्या साह्याने नाव शोधून देण्यासाठी मदत केली.
उमेदवारांचे प्रतिनिधी लॅपटॉप आणि प्रिंटर घेऊन उमेदवारांना त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक काढून देत होते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदाराचे नाव टाकून सहज क्रमांक व नाव शोधणे शक्य झाले.

Web Title:  Search for names in voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.